राज्यातील ३१ हजार शिक्षकांची प्रमाणपत्रे मुदतबाह्य : भवितव्य टांगणीला

Maharashtra TET - Teachers

पुणे :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ३१ हजार उमेदवारांची प्रमाणपत्रे २०२१ मध्ये मुदतबाह्य होणार आहेत. प्रमाणपत्राची वैधता सात वर्षे असते. प्रमाणपत्रावर तसे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. गेल्या सात वर्षांपासून विविध विषयांतील पदवीधर युवक शिक्षण शास्त्रातील पदवी, पदविका व टीईटी परीक्षेचे प्रमाणपत्र घेऊन प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये नोकरीच्या आशेवर आहेत. प्रमाणपत्र मुदतबाह्य झाल्यामुळे त्यांच्या समोर भवितव्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया गेल्या दहा वर्षांत विविध कारणांनी रखडली आहे. मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करून २०१३ मध्ये ३१ हजार ७२ विद्यार्थी टीईटी उत्तीर्ण झाले; मात्र त्यांना अद्याप नोकऱ्या नाहीत. बेरोजगार असणाऱ्या या शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्र अवैध होणार असून २०२१ पासून पुढील शिक्षक भरतीसाठी हे उमेदवार अपात्र ठरणार आहेत. अशा उमेदवारांना आपले वैधता प्रमाणपत्र पुन्हा मिळवण्यासाठी टीईटी परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे.

राज्यात दहा लाखांहून अधिक बी. एड., डी. एड. धारक बेरोजगार आहेत. दहा वर्षांपासून भरती रखडली आहे. यावर्षी आता कोठे शिक्षक भरतं प्रक्रिया सुरू झाली तोपर्यंत विद्यार्थ्यांव प्रमाणपत्र अवैधहोण्याचेसंकट ओढवले आहे. २०१३ ते २०१९ या कालावधीर टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षक पात्रत प्रमाणपत्र प्राप्त करणारे ८६ हजार २९१ उमेदवार आहेत. २०१३ मध्ये उत्ती् झालेले ३१ हजार उमेदवार व २०१) ते २०१९ पर्यंत उत्तीर्ण झालेले आणखी ५५ हजार उमेदवार नोकरीशिवाय बसू- आहेत. यापैकी अनेक जणांनी सेंट्रल टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली, तसेत अनेक उमेदवारांनी केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालयात पार्ट टाईम किंव कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षकपदावर भरतं होऊन तात्पुरती सोय केली असली तरी नोकरीत कायम होण्यासाठ त्यांना संघर्ष करावा लागणार आहे २०२१ नंतर टीईटी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शासनाकडून कायम वैधता मिळणार असल्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याची चर्चा आहे, तरीही गेल्या सात वर्षांत टीईटी उत्तीर्ण झालेल्यांच्या नोकरी आणि वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न डोक्यावर टांगत्या तलवारीप्रमाणे सतावत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER