बाहेरून येणाऱ्यांची सक्तीने चौकशी करण्याचे सीईओ राऊत यांचे आदेश

Abhijeet Raut

सांगली : सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 46 हजार 215 जण इतर जिल्ह्यातून आणि इतर राज्यातून आले आहेत. बाहेरुन येणाऱ्यांची सक्तीने चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी आशा वर्कर, आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. कोरोनाचा सर्व गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत राऊत यांनी सबधितांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतींच्या सुधारीत 15 व्या वित्त आयोगाच्या आराखड्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता , वृक्षारोपण, मनरेगाच्या कामांना प्राधन्य देण्याचेही दिले.

सांगली जिल्ह्यात येणाऱ्या लोकांना गरजेनुसार घरी किंवा संस्थात्मक पातळीवर अलगिकरण केले जात आहे. घरात अलगिकरण करण्यात आलेल्या केलेल्या संख्या जास्त आहे. त्यांच्या आरोग्याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. त्यांना चुकून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले तर त्यांच्या संपर्कातील इतर अनेक लोकांनाही मोठ्या प्रमाणात लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशा वर्कर व आरोग्य विभागाच्या माध्यमातुन या लोकांच्या भेटी नियमित घ्या. काही लक्षणे आढळली तर तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने 15 व्या वित्त आयोगाचा आराखडा मागवला आहे. ग्रामपंचायतींकडुन हा आराखडा पाठवण्यात आला होता. मात्र त्यामध्ये काही बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 व्या वित्त आयोगाचा आराखडा तयार करताना 50 टक्केपर्यंत पाणी पुरवठा व स्वच्छता या कामांना प्राधान्य देण्याचे आले आहेत. याशिवाय मनरेगाच्या कामांमध्येही वैयक्तीक कामांचा अधिक समावेश करावा, वृक्षारोपणला प्राधान्य देण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER