कृषी कायद्याबाबत केंद्राचा दुराग्रह, हे तर हम करे सो कायदा; अशोक चव्हाण याची टीका

ashok-chavan

मुंबई : नव्याने केलेले कृषी कायदे (Agricultural law) तूर्त स्थगित ठेवा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला होता. हा सल्ला सरकारने धुडकावला आहे, असे ट्विट काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले. केंद्राची ही दुराग्रही भूमिका ‘सबका साथ सबका विश्वास’ नसून ‘हम करे सो कायदा’ अशी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, केंद्राने केलेले कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी २१ दिवसांपासून दिल्लीत हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. काही शेतकरी संघटना या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेल्या. यात न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले आहे की, सरकारने हे कायदे तूर्त स्थगित ठेवावेत व एक समिती नेमून, चर्चेतून शेतकऱ्यांच्या शंका दूर कराव्यात.

केंद्राने न्यायालयाचा हा सल्ला धुडकावला आहे, असे अशोक चव्हाण ट्विटमध्ये म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER