केंद्राच्या धोरणामुळे कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले : पालकमंत्री सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर :  केंद्र सरकार नवनवीन कायदे आणून शेतकरी आणि कामगारांचे कंबरडे मोडण्याचे  काम करत असल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी  बुधवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला. केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार कायद्याविरोधात शुक्रवारी (दि.२) होणाऱ्या आंदोलनात काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.

काँग्रेस कमिटी कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कामगार आदी कष्टकरी समाजाचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्राच्या कष्टकऱ्यांच्या धोरणाविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि शहरात हे आंदोलन होणार आहे. कायद्याविरोधात जिल्ह्यातून पाच लाख सह्यांची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, प्रदेश प्रतिनिधी सुरेश कुराडे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, नगरसेवक राहुल खंजिरे, शशांक बावचकर, संजय पवार-वाईकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER