केंद्राचा निर्णय : इथेनॉल प्रकल्पांना आता ६ टक्के व्याजाने कर्ज

Loans to ethanol projects now at 6% interest

नवी दिल्ली : इथेनॉल (Ethanol) प्रकल्पांसाठीचे सुधारित धोरण केंद्र सरकारने जाहीर केले. त्यानुसार नव्या प्रकल्पांसाठी कर्जावरील व्याज दरात सूट देण्याची योजना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केली आहे. नव्या प्रकल्पांना ६ टक्के (6 %) व्याज दराने कर्ज दिले जाईल. कर्ज परतफेडीसाठी एक वर्षाचा मोरॅटोरियम देण्यात येणार आहे.

पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे देशाची क्रूड तेलाची आयात कमी होईल. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील चांगला दर मिळण्यास मदत होईल.

इथेनॉल निर्मितीचे प्रमाण ५० कोटी लिटरच्या खाली होते. हे प्रमाण आता कितीतरी पटींनी वाढले आहे. सध्या इथेनॉल निर्मिती क्षमता ६८४ कोटी लिटर इतकी आहे. केवळ मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करता येते, असे नव्हे; तर खराब धान्यापासूनही इथेनॉल तयार करता येते. सुधारित धोरणानुसार सर्व प्रकारच्या प्रकल्पासाठी व्याज दरात सूट देण्याची योजना राबविली जाणार आहे. व्याज दरात सूट दिल्याने केंद्र सरकारवर ४ हजार ५७३ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. वर्ष २०३० पर्यंत देशाला १ हजार कोटी लिटर इतक्या इथेनॉलची गरज भासणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER