केंद्राकडून सत्तेचा गैरवापर, आघाडीच्या लोकप्रतिनिधींना त्रास देण्याचा प्रयत्न – शरद पवार

Sharad pawar

मुंबई :- आज सकाळी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. जवळपास चार तासांच्या कालावधीनंतर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याला ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला.

दिल्लीतील सत्तेचा गैरवापर कसा करता येतो याचा प्रत्यय आज सकाळी दिसून आला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. मुळात सत्ता गेल्याने भाजप विचलित झाली आहे. राज्यात तीन पक्षांच्या सरकारचा यशस्वी प्रयत्न झाला. सध्या महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत आहे. सरकारला जनतेकडून समर्थन मिळत आहे. त्यामुळे सत्ता मिळणार नाही या नैराश्येत भाजपचे नेते आहेत. त्यामुळे दिल्लीतील सत्तेचा गैरवापर करून आघाडी सरकारमधील लोकप्रतिनिधींना त्रास देणे सुरू झाले आहे.

मात्र या सर्व संकटाचा सामना करण्यास महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सक्षम आहे. अशा प्रकारच्या दबावतंत्राला आमचे आमदार बळी पडणार नाहीत. हे सरकार योग्यरीत्या आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : …तर शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री नक्कीच करतील, चंद्रकांत पाटीलांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER