केंद्राचे कृषी कायदे : जयंत पाटील यांनी अंबानी, अदानी यांचे नाव घेऊन केली केंद्रावर टीका

Jayant Patil-Adani-Ambani

नागपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (Jayant Patil) यांनी आरोप केला की, अंबानी (Ambani), अदानी (Adani) यांना मदत करण्यासाठीच केंद्र सरकारने हे कायदे केले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पहिल्यांदाच अंबानी, अदानी यांचे नाव घेऊन आरोप केला. ते ‘राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमा’त बोलत होते.

काँग्रेसवर टीका
काँग्रेस मनपाची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करते आहे. यावर नाव न घेता टीका करताना पाटील म्हणालेत, आघाडी म्हणून पालिकेची निवडणूक लढवली जावी अशी आमची मागणी आहे. महाविकास आघाडीतील मित्रांशी बोलून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. पण ‘आमचाच पक्ष मोठा’ असे म्हटले तर अडचणी येऊ शकतात.

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करून लढायचे की स्वबळावर लढायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल. सर्व पक्षांनी एकत्रित ताकद लावली तर नागपूर जिल्हा परिषदेप्रमाणे नागपूर महानगरपालिकेतदेखील परिवर्तन होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER