केंद्र सरकारची मॉल, हॉटेल,रेस्टॉरंटसाठी नियमावली जारी

Restaurants - Shopping Malls - Hotels Open

मुंबई : देशात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारनं धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत. या नियमांची ८ जूनपासून होणार अंमलबजावणी.

मॉलसाठी नियमावली

 • – एसी 24 ते 30 दरम्यान असावा तर ड्युमिडीटी 40 ते 70 ठेवावी.
 • – पार्किंग आणि मॉल परिसरात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे बंधनकारक
 • – प्रवेश द्वारावर सॅनिटाइजर आणि थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक.
 • – कोरोना लक्षण नसणा-यांनाच प्रवेश दिला जाईल.
 • – होम डिलिवरी देणा-यांची थर्मल स्क्रिनिंगची जबाबदारी मॉल प्रशासनाची असेल.
 • – एलीवेटर वरून जाताना एक पायरी सोडून उभे रहावे.
 • – गेमिंग सेक्शन, लहान मुलांना खेळण्याचे ठिकाण आणि चित्रपटगृह बंद असतील.
 • – फूड रेस्टॉरेंटमध्ये बसणा-यांची क्षमता 50 टक्के पेक्षा जास्त नसावी.
  कार्यालयासाठी नियमावली
 • – कंटोन्मेंट झोन मध्ये राहणा-यांना कार्यालयात जाता येणार नाही. घरून काम करू शकता, कार्यालयीन उपस्थिती ग्राह्य धरली जाईल.
 • – विजिटर पास स्थगित केला जाईल. जर महत्त्वाचे असेल तर स्क्रिनिंग करून आणि ज्यांना भेटायचे आहे त्यांच्या परवानगीनं प्रवेश दिला जाऊ शकतो.
 • – व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटींग घ्यावी.

Check PDF:- Centre Issues New SOP for Malls

रेस्टॉरंटसाठी नियमावली

 • – टेक अवेला प्रोत्साहन द्यावे.
 • – डिलिवरी देणा-या व्यक्तीने जेवणाचे पाकिट हातात देऊ नये, ते दरवाजावर ठेवावे.
 • – हाॅटेलमध्ये आसन व्यवस्था 50 टक्केच असावी. मेन्यू एका वेळा पेक्षा जास्त केला जाऊ नये.
 • – बुके व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
 • – ग्राहक गेल्यानंतर सीट सॅनिटाईज करावे

Check PDF:- Centre Issues New SOP for Restaurants

हॉटेलसाठी नियमावली

 • – यादीत ग्राहकाची मागील ट्रॅवल हिस्ट्रीचे विवरण द्यावे. ग्राहकाची वैद्यकीय माहिती असावी.
 • – ओळखपत्र असावे आणि डिक्लरेशन फॉर्म भरून दिल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.
 • – कोणत्याही गोष्टीसाठी संपर्क येऊ नये यासाठी क्यूआर कोड, ऑनलाईन फाॅर्म आणि डिजिटल पेमेंट स्वीकारावे लागेल.
 • – रूममध्ये सामान पाठविण्यापूर्वी किटाणूरहित करावे लागेल.
 • – रूम सर्विस आणि टेक अवे ला प्रोत्साहन द्यावे.

Check PDF:- Centre Issues New SOP for Hotels

धार्मिक स्थळांसाठी नियमावली :

 • – चपला, शूज गाडीतच ठेवावे किंवा धार्मिक स्थळापासून दूर ठेवावेत.
 • – मंदिर, मशिद, चर्च, गुरूद्वारामध्ये जाताना हात पाय धुवून जावे
 • – रांगेत राहताना अंतर ठेवून उभे रहावे. तसेच ठराविक अंतरावर चिन्ह करून उभे रहावे.
 • – मूर्ती किंवा पवित्र गाथा, कुरान, बायबलला स्पर्श करता येणार नाही.
 • – धार्मिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
 • – प्रसाद किंवा जल हातानं देता येणार नाही.
 • – सामुदायिक अन्नदान, लंगरचे जेवण बनवताना आणि वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे.
 • – प्रवेश द्वार आणि बाहेर पडण्याचे द्वार वेगवेगळे असावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER