भारतातील औषधनिर्मिती क्षेत्राला नव संजीवनी देण्याचा केंद्राचा मानस : एस. व्ही. सदानंद गौडा

नवी दिल्ली : कोरोना (Corona Virus) काळात अवघ्या जगाला मदतीचा हात देणारे भारतातील औषधनिर्मिती क्षेत्राला नव संजीवनी देण्याचा केंद्राचा मानस आहे. घावूक औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्रांच्या विकासासाठी केंद्राकडून एकूण ७८,००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामधून २.५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास केंद्रीय रसायन आणि खते मंत्री एस. व्ही. सदानंद गौडा (S. V. Sadananda Gowda) यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्लीत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सीआयआय लाईफ सायन्स-२०२० परिषदेच्या उदघाटन प्रसंगी एस.व्ही.सदानंद गौडा बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची बनविण्याची क्षमता भारताच्या औषध आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रात दरवर्षी २८% वाढ होण्याचा अंदाज आहे. या उद्योगांमध्ये २०२५ पर्यंत ५० अब्ज डॉलर्सची उलाढाल होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा या उद्योगांसाठी केंद्राने तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती आणि चार ठिकाणी स्थायी वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्राची उभारणीस पाठिंबा दिला आहे. गौडा यांच्या वक्तव्यानंतर कोरोना काळानंतर जागतिक बाजारपेठेत देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी औषध निर्मिती क्षेत्राचे मोठे योगदान राहणार असल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER