दिल्लीत ‘सेंट्रल विस्टा’

Central Vista in Delhi

नवी दिल्ली :- दिल्लीत दरवर्षी प्रजासत्ताकदिनाचे संचलन राजपथवर हाेते. मात्र, आता पुढच्या वर्षी प्रजासत्ताकदिनाचे संचलन ‘सेंट्रल विस्टा’ या नव्या मार्गावर हाेणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ‘सेंट्रल विस्टा परियोजना’च्या विकासाचे भूमिपूजन केले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

‘सेंट्रल विस्टा परियोजना’मध्ये नॉर्थ ते साऊथ ब्लॉकपर्यंतचा परिसर समाविष्ट आहे. यात राजपथलगतची हिरवळ, झाडे, विजय चाैक, इंडिया गेट प्लाझा परिसराचा समावेश आहे. दिल्लीत सर्वाधिक पर्यटक ‘सेंट्रल व्हिस्टा’ परिसराला भेट देतात.

‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्प एकूण १२ हजार ८७९ काेटी रुपयांचा आहे. संसदेची नवी इमारतही ‘सेंट्रल विस्टा’ पुनर्विकास प्रकल्पात परिकल्पित आहे. विविध केंद्रीय कार्यालयांसाठीसुद्धा या परिसरात जागा उपलब्ध हाेणार आहे. सरकारी कार्यालयांना जागा मिळाल्यामुळे दरवर्षी भाड्यापाेटी खर्च हाेणाऱ्या एक हजार काेटी रुपयांची बचत हाेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER