केंद्रीय पथकाकडून शुक्रवारपासून कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Central squad inspects the flood area

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक शुक्रवारी कोल्हापुरात येत आहे. करवीर शिराळ तालुक्यातील पूरग्रस्त भाग चिखली आंबेवाडी, कुरुंदवाड, राजापूर, खिद्रापूर, इचलकरंजी आदी भागांची  हे पथक पाहणी करणार आहे.

कोल्हापुरात महापुराने थैमान घातले होते. ३७५ गावे पुराखाली गेली. घरे पडली, एक लाख हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त  झाली. व्यापा-यांचे सुमारे ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण स्थितीची पाहणी  करण्यासाठी केंद्र सरकारचे सात सदस्यांचे पथक कोल्हापुरात शुक्रवारी दाखल होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी  केली जाणार आहे. दोन दिवस या पथकाकडून आढावा घेतला जाईल. या पाहणीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.