संयम कसा बाळगावा हे उद्धव ठाकरेंकडून शिकलो : आदित्य ठाकरे

CM Uddhav Thackeray-Aditya Thackeray

मुंबई :- संयम कसा बाळगावा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून शिकलो, असे वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटले आहे. मुंबईच्या भल्यासाठी कारशेडचे स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असेही त्यांनी सांगितली.

मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कांजूरमार्गची जागा ही महाराष्ट्राच्या मालकीची असून त्यासाठी केंद्राच्या परवानगीची काहीही गरज नाही, असेही त्यांनी केंद्र सरकारला ठणकावले आहे. कारशेडच्या जागेवरून विरोधकांकडून राजकारण केलं जातं आहे.

कारशेड कांजूरमार्गला नेल्यानं मुंबईकरांचा फायदा होणार आहे. आरे कारशेडमुळे मिठी नदीच्या प्रवाहाला धोका होता अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली. माझं काम हेच विरोधकांना उत्तर आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात फार वेळ खर्च करत नाही. आम्ही राजकारण लोकांची सेवा म्हणून बघतो.

सध्या कामच एवढं असते की त्या व्यापात कुणाचीही चीड येत नाही असंही ते म्हणाले. महाराष्ट्रासाठी आम्ही सुख-समृद्धीचे दिवस आणू. लोकांचा विश्वास महाविकास आघाडी सरकारवर आहे, असे मतही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER