केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच लसीकरण

PM Modi - Covid Vaccine

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (Corona) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दर दिवसाला देशात लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.यापूर्वी सर्वात आधी ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस (Coronavirus Vaccination) देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोव्हिड प्रतिबंध लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. देशात लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहितही केलं जाणार आहे. तसंच लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंक पहिल्यांदा घोषित केलेल्या किंमतींवर राज्य सरकारांना आणि खुल्या बाजारातही विक्री करु शकणार आहेत. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. नरेंद्र मोदींनी देशातील डॉक्टर आणि मेडिकल फार्मा कंपन्यांशी चर्चा केली. मोदींनी यावेळी कोरोना टियर 2 आणि टियर 3 मधील शहरांमध्ये वाढत असल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत होती. आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button