केंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल -बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil

मुंबई : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले, देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रात ७५ टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. निर्यातीमध्येसुद्धा जवळपास ८० टक्के कांदा हा राज्यातील शेतकरी बांधवांचा असतो. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होईल.

खासदार शरद पवार यांनीसुद्धा काल केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदीसंदर्भात चर्चा केली. तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत, लिलाव थांबले आहेत या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भिसे यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाला कांदा निर्यातबंदी उठवावी अशी विनंती करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER