केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत ; शरद पवारांची दिल्लीकरांशी झाली चर्चा

Sharad Pawar - Harsh Vardhan - Maharashtra Today

मुंबई : राज्यात लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. मात्र, केंद्र सरकार (Central Government) आणि आरोग्य खाते संपूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या पाठीशी असल्याचे राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. कोरोनाची (Corona) राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने, सामूहिकपणाने आपण सामोरे गेलेच पाहिजे.

आता त्याला पर्याय राहिलेला नाही. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे की, आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्य सरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे कळकळीचे आवाहन शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेला आज केले. राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय त्याचप्रमाणे केंद्रसुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे, असे सांगतानाच कालच देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला. ज्या कमतरता आहेत याबाबत चर्चा केली.

त्यांनी या सर्व संकटात केंद्र सरकार व आरोग्य खातं पूर्ण शक्तीने सर्व राज्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील सरकारच्याही पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची मदत व आपल्या सर्वांचा सामूहिक प्रयत्न यातून मार्ग काढायचा आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button