मोदी सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांची चिंता मिटली

PM Modi

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना घरातुन काम (वर्क फ्रॉम होम ) करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये बरेच कर्मचारी आहेत जे आउटसोर्स धोरणानुसार विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागात काम करतात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे तेही आपल्या घरातून काम करत आहेत. लॉकडाऊन काळात त्याना घरातून काम केल्याबद्दल पगार मिळणार की नाही हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. सरकारच्या एका निर्णयामुळे त्यांना आता दिलासा मिळाला आहे.

संभ्रमाचं वातावरण असल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना पगार मिळणार की नाही अशी भीती होती. पण आता अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने हे स्पष्ट केले आहे की लॉकडाउन कालावधीत आउटसोर्स कर्मचार्‍यांचाही विचार केला जाईल. ज्या प्रमाणे कायम कर्मचाऱ्यांना प्रमाणे त्यांनाही पगार मिळणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER