कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून मिळणार 5 लाख रुपयांची मदत : अनुराग ठाकूर

anurag thakur - Maharashtra Today

मुंबई :- कोविड-19 (Covid-19) मुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. आज माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत (Journalist Welfare Scheme) ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी माहिती दिली.

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 26 पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्र सरकारने मान्यता दिली. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार कल्याण योजना समितीच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केंद्र सरकारने (Central Govt) अशा प्रकारची मदत कोविड मुळे मृत्यू झालेल्या 41 पत्रकारांच्या कुटुंबियांना केली होती. दरम्यान, समितीकडून आठवड्याला JWS बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने JWS अंतर्गत आर्थिक मदतीसाठी आलेल्या अर्जावर त्वरीत निर्णय घेता येईल. त्याचबरोबर समिती कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 11 पत्रकारांच्या कुटुंबियांच्या मदती अर्जांचा देखील विचार करत आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात अनेक पत्रकारांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकराचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button