केंद्र सरकारने देशवासीयांना कोरोना लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी : नाना पटोले

Coronavirus Vaccine - Nana Patole

मुंबई :- देशात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) देशवासीयांना कोरोना लस (Coronavirus Vaccine) विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणारे निवेदन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज दुपारी विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांना दिले . यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला.

केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळं ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे. तसंच पाकिस्तानला भारतानं लस फुकट दिली मग देशातील नागरिकांना का नाही, असा सवालही त्यांनी केला.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा सगळीकडे विनामास्क फिरतात त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले माहीत नाही? असे नाना पटोले म्हणाले. त्यासोबतच नरेंद्र मोदींनीच कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे, असं जाहीर केलं होतं. आता तेच राज्यांवर जबाबदारी ढकलत आहेत. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांंनी नियोजन करून आपल्या देशाला कोरोनामुक्त केलं. आपल्या प्रमुखाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. त्यांनी लसी, ऑक्सिजन, आरोग्यसेवा यापैकी कशाचेही नियोजन केले नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे, नाना पटोलेंचा खोचक प्रश्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button