
जळगाव : महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक असो की तामिळनाडू असो शेतकरी हा शेतकरी असतो; त्यांना सन्मानाची वागणूक द्या, अशी मागणी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्र सरकारला केली आहे. जळगाव जिल्ह्यातील कजगाव येथे रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते.
यावेळी ते बोलत होते . शेतकरी आंदोलन सुरू झाले त्यावेळी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. रस्ते खोदण्यात आले. या चुकीच्या गोष्टी आहेत अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ६० दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
येत्या २६ जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारला असता रोहित पवारांनी पक्षाची भूमिका काय आहे, हे माहिती नाही. मात्र, शरद पवार यांचा २६ जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला