कोरोनाला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार : संभाजी भिडे

Sambhaji Bhide

सांगली :- शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे.” असे संभाजी भिडे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगलीत म्हणाले.

हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षणक्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची (Lockdown) गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारू दुकाने वाढवायचे काम सुरू आहे. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत. गांधी आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी मास्कबद्दल हे वक्तव्य पहिल्यांदाच केले, असे नाही. यापूर्वी त्यांनी गेल्या महिन्यात शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला होता. त्यावेळी संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते. सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर याना लावलेला मास्क भिडे यांनी काढायला लावला. कार्यक्रमात इतर कार्यकर्तेदेखील विनामास्क आढळून आले होते.

मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड

राज्यात वीकेंड लॉकडाऊन करून महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून रात्री ८ ते सकाळी ६ पर्यंत सर्व बंद राहील. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येही काही बदल होतील. त्याचबरोबर मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल.

ही बातमी पण वाचा : कोरोना लसीच्या पुरवठ्याचा वाद पेटला केंद्र आणि राज्याचे आरोग्यमंत्री आमने सामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button