कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने

CM Uddhav Thackeray - Kanjurmarg Car Shed - PM Narendra Modi

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले  आहेत. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राच्या अधिकारात असल्याचा दावा केंद्र सरकारने (Central Government) केला आहे. नुकतेच केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एमएमआरडीएने तत्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले आहे.

कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे केंद्राने या पत्रात नमूद केले आहे.

यापूर्वीही एमएमआरडीएचा (MMRDA) प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे एमएमआरडीएने या कारशेडचे काम त्वरित थांबवावे, असेही केंद्राने या पत्रात लिहिले  आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रानंतर आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्राच्या या पत्रानंतर राज्य सरकार यावर काय उत्तर देते  याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER