शतधौत घृत – त्वचेचे संरक्षण आणि बरंच काही!

तूप त्वचेकरीता खूप फायदेशीर आहे. त्वचेचा उजळपणा असो वा मार्दवता येण्याकरीता तूप आहारात असणे आवश्यक आहे. तसेच अनेक विविध घरगुती लेपांमधे तूप मिसळून लावल्यास त्वचेचा रुक्षपणा नक्कीच नाहीसा होतो. याचा अनुभव आपण घेत असतो. आयुर्वेदात अगदी साधी सरळ सोपी त्याबरोबर प्रभावी अशी अनेक कल्प सांगितली आहेत. त्यापैकी एक आहे शतधौत घृत !

हा कल्प किंवा मलम क्रीम स्वरूपात सांगितला आहे. बनवायला अतिशय सोपा आणि अगदी २ साहित्यामधे बनणारा. शत – शंभर वेळा धुतलेल तूप म्हणजे शतधौत घृत क्रिम होय. गाईचे तूप तांब्यांच्या पात्रात पाणी टाकून शंभरवेळा तांब्यांच्या वाटीने फिरवत राहणे हळूहळू तूप घट्ट व्हायला लागते आणि क्रिम प्रमाणे तयार होते. झाले तयार शतधौत घृत ! केमिकल्स नाही काही preservatives ची गरज नाही, नैसर्गिकरित्या त्वचेचे संरक्षण मात्र नक्की.

बघूया हे शतधौत घृत कोणत्या अवस्थेत वापरता येईल –

  • त्वचेचा रुक्षपणा, कोरडेपणा त्वचा फाटणे.
  • ओठ, हातपायाला भेगा पडणे.
  • ऊन वा थंडीमुळे त्वचा काळवंडणे.
  • काळे डाग, व्यंग असणे.
  • डोळ्याखाली काळे वर्तुळ असणे.
  • एक्झीमा, त्वचा भाजणे, त्वचा विकार.
  • मूळव्याध फिशर असणे.
  • हातापायाची, चेहर्‍याची आग होणे.
  • बाळाला डायपरमुळे रॅश येणे. लंगोट वा ओल्या कपड्यांनी त्वचा लाल होणे.

अशा सर्वच त्वचेच्या काळजी करता उत्तम क्रिम आहे हे शतधौत घृत. आयुर्वेद औषधालयात किंवा वैद्याकडे हे हमखास उपलब्ध असते त्याचा नक्कीच या हिवाळ्यात वापर करून बघा.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER