चिथावणी देणाऱ्या खात्यांबाबत ट्विटरला केंद्राचा कारवाईचा इशारा

Twitter - Farmer Genocide - MeitY

दिल्ली : ‘फार्मर जिनोसाइड’ (Farmer Genocide) या हॅशटॅगशी संबंधित मजकूर आणि खाती हटवण्याच्या आदेशाचे पालन करा; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारने ट्विटरला (Twitter) दिला आहे. याबाबत केंद्राने ट्विटरला नोटीस बजावली आहे.

दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या केंद्र सरकार (Central Government) आंदोलनाबाबत सरकारवर शेतकऱ्यांचा (Farmers Protest) संहार घडवू पाहत असल्याचा आरोप करणाऱ्या चिथावणीखोर सुमारे २५० खात्यांवर प्रतिबंध घाला, असे निर्देश माहिती-तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने ३१ जानेवारीला ट्विटरला दिले होते. मात्र, ट्विटरने ही खाती पूर्ववत केली. याबद्दल केंद्राने नाराजी व्यक्त केली. ट्विटरने सरकारच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असून, तसे न केल्यास दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागेल, असे केंद्राने या नोटिसमध्ये बजावले आहे. सरकारचे आदेश आणि अधिकार याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अर्धा डझनहून अधिक निकालांचा नोटीसमध्ये दाखला देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER