कोरोनाच्या लढ्यासाठी केंद्राकडून राज्यांसाठी ११ हजार ०९२ कोटींचा निधी मंजूर

नवी दिल्ली :- नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या २५६६वर पोहोचली आहे. त्यापैकी १९१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील २४ तासांमध्ये ३२८ नवी रूग्ण समोर आले आहेत. यापार्श्वभूमीवर करोनाचा सामना करण्यासाठी आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आपत्कालीन निधीनुसार राज्यांना ११ ,०९२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमित शहा यांनी राज्यांमध्ये क्वारंटाइन केंद्र स्थापन करण्यासाठी आणि इतर आवश्यक बाबींसाठी राज्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांसाठी हा ११ ,०९२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. वर्ष २०२०-२१ नुसार स्टेट डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट फंडनुसार राज्यांना पहिल्या टप्प्यातील हा निधी मंजूर झाला आहे. यामुळे राज्यांना करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.