केंद्राकडून ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला धमकी; हसन मुश्रीफ यांचा आरोप

Hassan Mushrif

नगर : कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस तयार करणार्‍या सिरम संस्थेने जूनमध्ये १० कोटी डोस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु केंद्राने ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला धमकी दिली. यामुळेच डोस मिळू शकले नाहीत. एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे कंपन्यांना धमक्या द्यायचा, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हसन मुश्रीफ म्हणाले की, “लसीकरणासाठी एकच राष्ट्रीय धोरण असावे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो तर ४५ वर्षांवरील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो… देशात असा गोंधळ सुरू आहे. मग आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचे फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर लावू. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. याबाबत त्यांच्याकडून सर्व मुद्दे मांडले जातील.”

त्याचप्रमाणे, अमेरिकेने २५ हजार कोटींचे डोस भारताला दिला आहे. लसीबाबत मुश्रीफ यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले की, “अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे आभार मानलेच पाहिजे. अमेरिकेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचा प्रचार केला. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना भारतात आणले आणि याचा आकस न धरता, भारतीयांवर अन्याय होऊ नये, यासाठी त्यांनी २५ कोटी लसीचे डोस देण्याचे ठरविले. यावरून त्यांचे मन किती मोठे आहे, हे लक्षात आले.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button