व्हॉटस् अ‍ॅप सीईओंना केंद्राने फटकारले

WhatsApp - Meity

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) व्हॉटस् अ‍ॅपची कानउघाडणी करीत गोपनीय प्रस्तावित बदल मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. निवडीचे स्वातंत्र्य तसेच माहिती सुरक्षेसंबंधी धोरणावर नव्याने विचार करण्याचा सल्ला मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

भारतीय नागरिकांना योग्य सन्मान दिला पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञानासंबंधी संसदेच्या स्थायी समितीची २१ जानेवारीला बैठक होणार आहे. बैठकीत व्हॉटस् अ‍ॅपच्या गोपनीय धोरणावर चर्चा होणार आहे. बैठकीत फेसबुक तसेच ट्विटरच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुठलेही एकतर्फी बदल योग्य नाहीत. तसेच स्वीकारणार नाही, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले. व्हॉटस् अ‍ॅपची सेवा तसेच गोपनीय धोरणातील प्रस्तावित बदल भारतीय नागरिकांची आवड तसेच स्वायत्ततेबाबत गंभीर चिंता निर्माण करणारे आहे, असे खडे बोल पत्रातून कॅथार्ट यांना सुनावण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER