मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा : अशोक चव्हाण

Ashok Chavan

मुंबई :- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणावरील (Maratha Reservation) स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले.

मराठा आरक्षणाची २५ जानेवारीपासून सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारची आणि वकिलांची ११ तारखेला दिल्लीत बैठक आहे. मी स्वतः त्या बैठकीला दिल्लीत जाणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीतील सहकारीही या बैठकीला हजर राहतील. राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे. मागील सुनावणीत अटर्नी जनरलला नोटीस काढण्यात आलेली आहे, अशी माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण : वकिलांच्या समन्वयासाठी समिती स्थापन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER