केंद्राकडून मुंबई ‘हाफकिन’ला ६५ कोटींचा निधी; तीन कंपन्यांमार्फत लवकरच लसनिर्मिती

Halfkin vaccine

नवी दिल्ली :- कोरोनाची (Corona Virus) रुग्णसंख्या रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे देशात लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अशातच आता कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मंजुरी दिली आहे. यामध्ये हाफकिन (Halfkin vaccine) बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई; इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड (आयआयएल), हैदराबाद; भारत इम्युनोलॉजिकल अँड बायोलॉजिकल लिमिटेड, बुलंदशहर; या तीन कंपन्यांचा समावेश आहे. हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडला केंद्र सरकारनं ६५ कोटींचा निधीही जाहीर केला आहे.

हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (Halfkin Biopharmaceutical Corporation Limited) मुंबई ही महाराष्ट्राच्या राज्य सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी दरमहिन्याला दोन कोटी कोवॅक्सिन लसींचं उत्पादन करणार आहे. हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडला केंद्र सरकारनं ६५ कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. भारत बायोटेकच्या तंत्रज्ञानाद्वारे हापकिन दरमहा दोन कोटी लसींचं उत्पादन करू शकते. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या हैदराबाद येथील इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड (आयआयएल) केंद्र सरकारनं ६० कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. बुलंदशहर येथील भारत इम्युनोलॉजिकल अँड बायोलॉजिकल लिमिटेड (बीआयबीसीओएल) या कंपनीला केंद्र सरकारनं ३० कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. दरमहा एक ते दीड कोटी डोस तयार करण्यासाठी सुविधा तयार करावी म्हणून हे अनुदान देण्यात आलं आहे. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सीपीएसई अंतर्गत ही संस्था चालवली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button