हाथरससारख्या घटना रोखण्यासाठी केंद्राने कडक कायदा करण्याची गरज – अजित पवार

Ajit Pawar

पुणे : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) तरुणीबाबत जे घडले ते अत्यंत दुर्दैवी होते. कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरीही अशा घटना घडता कामा नये. अशाप्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदा करण्याची गरज आहे. जेणेकरुन असा प्रकार करणारी विकृती दहा वेळा विचार करेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, हाथरसमध्ये माणुसकीला काळीमाफासणारी घटना घडली. जो प्रकार घडला त्याला शब्द नाहीत. अशा घटना महिलांच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत आहेत. घटना घडल्यानंतर काही काळ चर्चा होते आणि जो तो आपापल्या कामाला लागतो. निर्भया घडले, त्यानंतरही अनेक घटना घडल्या. केंद्र सरकारने त्यासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे, असे मत अजित पवार यांनी मांडले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हाथरसला जाण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना पीडीतेच्या कुटुंबाला भेटू दिलं पाहिजे. कारण संसद असेल किंवा विधानसभा, तो विषय मांडण्यासाठी खरी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असते, असेही अजित पवारांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER