रेमडेसिवीरवरून केंद्र १०० टक्के अन्याय करतंय : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

मुंबई : पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्र सरकारतर्फे कोरोना लस (Coronavirus Vaccine) आणि रेमडेसिवीर वितरणावर भाष्य केले आहे. केंद्र सरकार जी लस देत आहे, त्याचे वितरण प्रामाणिकपणे राज्य सरकार करत आहे. गरिबांना लस मोफत दिली पाहिजे. नाशिकमध्ये ऑक्सिजनची (Oxygen) प्रचंड कमतरता आहे.

रेमडेसिवीर कधी पुण्याला घेऊन जातात तर कधी ठाण्याला आणि आम्हाला २०० आणि ३०० ही येत नाहीत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. केंद्र सरकार १०० टक्के अन्याय करत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत केंद्र सरकारकडून कोणताही हस्तक्षेप नसताना आम्हाला ३६ हजार मिळत होते आणि केंद्राने हा कार्यक्रम हाती घेतल्यावर ही संख्या २६ हजारांवर गेली. हे २६ हजार रेमडेसिवीरसुद्धा वेळेवर मिळत नाहीत, असे भुजबळ म्हणाले.

रेमडेसिवीरसाठी (Remdesivir) कसले श्रेय घेता?

“रेमडेसिवीर काय विरोधी पक्षनेत्यांच्या घरात बनते का? त्यांना पुरवते कोण? या देशातील फार्मा कंपन्या ते तयार करतात. उपकार करतात का ते महाराष्ट्रावर? फक्त भाजप करते असे ते सांगतात; पण काहीच करत नाहीत. सर्वांनी मिळून काम केले तर हा कोरोना आटोक्यात येईल, असे छगन भुजबळ म्हणाले. “मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत.

कोरोनावर उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान हे कुंभमेळा आणि निवडणूक प्रचाराकडे लक्ष देत होते. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. काही ठिकाणी ती स्थिर आहे. लॉकडाऊन वाढवला तर अर्थचक्राच्या बाबतीत नुकसान निश्चित होणार आहे. पण रुग्णसंख्या जी कमी झाली तिचे श्रेय नक्कीच लॉकडाऊनला देता येईल.” असेदेखील भुजबळ म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button