महाराष्ट्रावर अन्याय नाही; केंद्राने ठाकरे सरकारला आतापर्यंत २८ हजार १०४ कोटींची मदत केली- फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाच्या स्थितीवर बोलताना मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणातून केंद्राकडून अपुरी मदत केल्याचा सूर निघतो. तसेच, कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केरळकडेदेखील मदत मागितली आहे.

राज्यात कोरोनाने उद्रेक केला आहे. त्यातच कोरोनाची स्थिती हाताळण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे विरोधकांनी म्हटले. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली याचा पूर्ण लेखाजोखाच मांडला आहे. केंद्र सरकार पुरेशी मदत करत नसल्याचे वारंवार सांगतात; पण केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वतोपरी हवी ती सगळी मदत केल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून दिले.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राला १ लाख ६० हजार कोटी रुपये कर्ज मिळेल अशी केंद्राची व्यवस्था – फडणवीस

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

कोरोनाची स्थिती योग्य पद्धतीने नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना गरीब कल्याण योजना, वीस लाख कोटींचे पॅकेज असो अशा सर्व महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मदत केली आहे. मात्र तरीही केंद्र सरकार महाराष्ट्राला पूरेशी मदत करत नसल्याचा आरोप ठाकरे सरकार करतं.  महाराष्ट्रावर अन्याय होतो अशी प्रतिमा तयार केली जात आहे; पण केंद्रातील मोदी सरकारने  ठाकरे सरकारला आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींची मदत केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 • 4 हजार 592 कोटींचे अन्नधान्य केंद्र सरकारने राज्याला दिले.
 • कृषी सन्मान योजना, जनधन योजनेतूनही केंद्र सरकारने निधीचा पुरवठा केला.
 • गरीब कल्याण योजनेअंतर्गत थेट महिलांच्या खात्यात 3 हजार 800 कोटी रुपये जमा केले.
 • केंद्र सरकारकडून गरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला.
 • उज्ज्वला योजनेतून 1 हजार 600 कोटींचा निधी दिला.
 • स्थलांतरित मजुरांसाठी महाराष्ट्रातून जवळपास 600 रल्वे सोडल्या.
 • केंद्र सरकारने श्रमिक रेल्वेसाठी जवळपास 300 कोटी रुपये दिले.
 • मजुरांच्या छावणीसाठी केंद्रानेच 1611 कोटी दिलेत.
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याला लागणारी मदत म्हणजे, पीपीई किट, एन 95 मास्कचा पुरवठाही केंद्र सरकारने केला आहे.
 • एप्रिल आणि मे महिन्याचा निधीही केंद्र सरकारने राज्याला दिला आहे.
 • तसेच, केंद्राने राज्याला 4 हजार 500 कोटींचा कर दिला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंत 19 हजार कोटींचा एकूण निधी केंद्राने राज्याला दिला आहे.

केंद सरकार सर्व राज्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पूरवत आहेत. महाराष्ट्रालाही मोदी सरकारने सर्वतोपरी मदत केली आहे त्यामुळे राज्य सरकार केंद्रावर कोणताही ठपका ठेवू शकत नाहीत. असे फडणवीस यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER