रिया चक्रवर्तीच्या जामिनाविरुद्ध केंद्र सरकार गेले सुप्रीम कोर्टात

सुशांत सिंगशीू संबंधित ‘एनडीपीएस’ प्रकरण

नवी दिल्ली: संशयास्पद मृत्यू झालेला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Case) यास अमली पदार्थ उपलब्ध करून देण्यास मदत करण्याच्या आरोपावरून अमली पदार्थविरोधी विभागाने (Narcotics Control Bereau-NCB) दाखल केलेल्या खटल्यात बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) हिला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाविरुद्ध केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (Special Leave Petition-SLP) दाखल केली आहे.

केंद्र सरकारची ही ‘एसएलपी’ सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे येत्या १८ मार्च रोजी प्राथमिक सुनावणीसाठी येईल, अशी अपेक्षा आहे.

अमली पदार्थ विरोधी कायद्याखालील गुन्ह्यांसाठी रियाला ८ सप्टेंबर रोजी अटक झाली होती. तिच्यासोबत सॅम्युअल मिरांडा आणि सुशांत सिंगचा घरगडी दीपेश सावंत या सहआरोपींना उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे एक लाख व ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला होता. त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी त्या निकालाला एक आठवड्याची स्थगिती देण्याची विनंती केली होती. खंडपीठाने ती मान्य केली नव्हती. त्यानंतर आता पाच महिन्यांनी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘एसएलपी’ केली आहे.

जामीन देताना उच्च न्यायालयाने म्हटले होते की, सुशांत सिंगला अमली पदार्थ पुरविणाºया लोकांशी रियाचा प्रत्यक्ष संबंध होता, असे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. फार तर अमली पदार्थांच्या देवाण-घेवाणीची तिला माहिती होती व ती तिने पोलिसांना कळविली नाही, असे म्हणता येईल. शिवाय आरोपींकडे आढळून आलेले अमली पदार्थांचे प्रमाण धंद्यासाठी नव्हे तर व्यक्तिगत सेवनापुरते होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER