गोवा विद्यापीठात मराठा संशोधन अध्यासन केंद्र : संभाजीराजे यांची मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मागणी

Sambhaji Raje Chhatrapati - Pramod Sawant

गोवा : गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची खा. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आज भेट घेतली. गोवा विद्यापीठात (Goa University) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) नावाने, मराठा संशोधन अध्यासन केंद्र सुरु करावे, अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी यावेळी केली.

याबाबत फेसबुक पोस्टवर माहिती देताना खा. संभाजीराजे यांनी म्हटले आहे की,गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. पोर्तुगीजांशी लढा देऊन शिवछत्रपतींच्या काळापासून अगदी करवीर छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांच्यापर्यंत स्वराज्याचा विस्तार करण्यात आला आहे. या संदर्भात अनेक जुन्या नोंदी गोवा पुराभिलेख कार्यालयात, गोवा विद्यापीठात आणि इतिहास अभ्यासकांकडे मिळतात.

या सर्वांची दुर्मिळ कागदपत्रे, पत्रव्यवहार, संदर्भ ग्रंथांचे पुन्हा प्रकाशन करावे. गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, मराठा संशोधन अध्यासन केंद्र सुरु करावे, जेणेकरून इतिहास अभ्यासकांना त्याचा लाभ होईल. तसेच गोवा विधानभवन, मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालयात शिवछत्रपतींचे तैलचित्र लावावे. तसेच रायगड किल्ल्याविषयी काही जूनी कागदपत्रे मिळाल्यास रायगड विकास प्राधिकरणाला मिळावीत म्हणून विनंती केली. जेणेकरून संवर्धन कार्यात या पुराव्यांचा फायदा होईल. मुख्यमंत्री मुळातच शिवभक्त असल्याने गोवा सरकारकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER