कांदा निर्यातबंदीमुळे नुकसान भरपाई केंद्र आणि राज्याने द्यावी : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर : देशांतर्गत यंदा कांद्याचे कमी उत्पादन झाल्याने भाव वाढू शकतात. कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावेत, यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसू शकतो. कांदा निर्यातबंदी करण्यापूर्वी याबाबत सविस्तर आढावा आणि चर्चा करण्याची गरज होती.

केंद्र शासनाला सध्या हा निर्णय योग्य वाटल्याने तो घेतला आहे. निर्यातबंदीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव गडगडू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याचे जे काही आर्थिक नुकसान होईल, त्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाने घ्यावी. शेतकऱ्याला मिळणारा कांद्याचा भाव आणि निर्यातबंदीमुळे होणारे नुकसान यातील समतोल साधत केंद्र आणि राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज कोल्हापुरात व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER