
नागपूर :- ओबीसींसाठी (OBC) २७ टक्के आरक्षणानुसार जिल्हा परिषद निवडणुका (ZP Elections) घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना (Census) करावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.
याबाबतची मागणी आशिष देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केली. कोर्टाच्या निर्णयामुळे सव्वा वर्षातील ग्रामपंचायतीच्या सर्व जागा रद्द होण्याची शक्यता आहे. पाचही जिल्ह्यात ओबीसींना मोठा फटका बसणार आहे. दोन आठवड्यात सर्व निवडणुका घ्यावा लागणार. या निवडणुकीत सर्व जागा खुल्या वर्गासाठीच राहणार आहे. यामुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार आहे. राज्य सरकारने राज्यात ओबीसींची जनगणना करावी आणि त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे. जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढावे, अशी मागणी देशमुख यांनी केली. दरम्यान, स्वबळावर लढल्यास या पाचही जिल्हा परिषदेत काँग्रेसला मोठे यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
हम भी इस देश के है हमारी भी गिनती करो .. ओबीसी जनगणना की आवश्यकता और अपरिहार्यता है ..कुछ यादे और कुछ वादे https://t.co/2yQi1fBgw0
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 24, 2021
पंकजा मुंडेंची मागणी
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काही दिवासांपूर्वी ट्विट करून भाजपला जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आणि गरजही आहे. ‘कुछ यादे और कुछ वादे’ असे ट्विट केले आहे. पंकजा यांनी पोस्टसोबत एक व्हिडीओही अपलोड केला आहे. हा व्हिडिओत लोकसभेतील गोपीनाथ मुंडे भाषण आहे. यात त्यांनी लोकसभेतील उपनेते म्हणून ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. भाजपची सत्ता आल्यानंतरही ओबीसींची जनगणना झाली नाही. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना आपण काय लिहिले, हे समजण्यासाठी त्यांनी हिंदीत ट्विट लिहिले असावे, असे राजकीय जाणकार सांगतात.
ही बातमी पण वाचा : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीसांनी केली मागणी; अजितदादांनी बोलावली तातडीची बैठक
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला