सिमेंट- स्टील उत्पादकांच्या नफेखोरीचा पायाभूत सुविधा उभारणीवर होतो दुष्परिणाम – गडकरींची टीका

Nitin Gadkari

नवी दिल्ली : देशातील सिमेंट (Cement) आणि स्टील (Steel) कारखानदारांच्या नफेखोरीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं (Nitin Gadkari) यांनी थेट टीका केली. म्हणालेत, सिमेंट आणि स्टीलचे कारखानदार एकत्र येऊन दोन्ही उत्पादनांचे भाव वाढवून ठेवतात. त्याचा दुष्परिणाम पायाभूत सुविधा उभारण्याच्या खर्चावर होतो.

पश्चिम भारतातील बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, की सिंमेट आणि स्टील उत्पादक नियमितपणे भाव वाढवत राहतात. लेबर आणि पॉवर कॉस्ट वाढत नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने सिमेंट आणि स्टीलचे दर वाढताना दिसतात. प्रत्येक स्टील आणि सिमेंट कंपन्यांच्या स्वतःच्या खाणी आहेत.

या भाववाढीची कारणे माझ्या आकलनापलिकडची आहेत. हे देशाच्या हिताचे नाही. येत्या ५ वर्षांत १११ लाख कोटी रूपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन केंद्र सरकार करते आहे. पण सिमेंट आणि स्टीलचे दर याच वेगाने वाढत राहिले, तर अवघड होईल. सरकार त्याचा गांभीर्याने विचार करेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला.

या मक्तेदारिला आळा घालण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सूचना पाठवून नियामक प्राधिकरण तयार करण्याची शिफारस करणार आहे, असे गडकरींनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER