जुळ्या मुलांपैकी एका मुलाला गमावले आहे सेलिना जेटलीने, शेअर केली भावनात्मक पोस्ट

Celina Jaitley

पोटचं मुल दगावल्याचं दुःख काय असतं हे अन्य कोणाहीपेक्षा त्या मातेचेच काळीज कुरतडणारे असते. त्यातही नुकत्याच जन्मलेल्या बाळाने इहलोकीची यात्रा संपवली असेल तर त्या आईच्या दुःखाची कोणी कल्पनाही करू शकत नाही. असेच दुःख अभिनेत्री सेलिना जेटली आपल्या हृदयात पचवून हसतमुखाने दुसऱ्या मुलाचा सांभाळ करीत आहे.

17 नोव्हेंबरला असलेल्या ‘वर्ल्ड प्रीमॅच्युअर डे’ निमित्त सेलिना ने सोशल मीडिया वर एक अत्यंत इमोशनल पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये सेलिनाने तिच्या जीवनातील या दुःखाची अत्यंत भावनात्मक गोष्ट सांगितली. तिची ही पोस्ट वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. 17 नोव्हेंबर 2011 पासून ‘वर्ल्ड प्रीमॅच्युअर डे’ चे आयोजन केले जाऊ लागले आहे. ज्या बाळांचा जन्म वेळेच्या आधी म्हणजेच प्रीमॅच्युअर होतो, त्यांना भेडसावणाऱ्या कठीण परिस्थितीची, आजाराची, समस्यांची माहिती देण्यासाठी हा दिवस ठरविण्यात आला आहे. या दिवसाच्या निमित्ताने सेलिनाने तिच्या जीवनातील अश्या घटनेची माहिती शेअर केली आहे. यासोबत तिने आपल्या लहान मुलासोबत फोटोही शेअर केला असून त्याच्यासाठी प्राथर्ना करण्याची आणि आशीर्वाद देण्याची विनंतीही केली आहे.

सेलिनाने पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘प्रत्येक वर्षी लाखो मुलं वेळेच्या आधी जन्माला येतात. अशा मुलांच्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस ठरवण्यात आला आहे. वेळेच्या आधी जन्म होणे हे कुठल्याही मुलासाठी चांगले नसते. यामुळे अनेक कॉम्पलीकेशन्स उद्भवतात. अनेकदा विविध विकारांचा सामनाही करावा लागतो. केवळ मुलांनाच नव्हे तर मुलाच्या आईलाही खूप मोठे दुःख सहन करावे लागते. मोठ्या कालावधीसाठी त्या छोट्या बाळाला पेरेंट्स निओनेटल इंटेसिव केयर यूनिट (NICU) मध्ये ठेवावे लागते. त्याबरोबरच त्याच्याकडे 24 तास लक्ष द्यावे लागते. मात्र हे लक्ष आईला देता येत नाही तर, बाळ पूर्णपणे डॉक्टरांच्या हवाली असते. आई डॉक्टरांवर विश्वास ठेवते आणि बाळ चांगले रहावे यासाठी देवाची प्रार्थना करीत असते. मी स्वतः या स्थितीतून गेली आहे. मी जुळ्या मुलांना जन्म दिला तेव्हा माझा एक मुलगा NICU मध्ये होता आणि आणि दुसऱ्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली जात होती. तेव्हा माझी मनस्थिती काय असेल याची कल्पना तुम्हाला कदाचित येणार नाही. मात्र NICU चे डॉक्टर्स आणि नर्स यांना जेवढे धन्यवाद देता येतील तेवढे कमीच आहेत. केवळ त्यांच्यामुळेच आमचा आर्थर तरी आमच्यासोबत घरी येऊ शकला.

सेलीनाने पोस्ट मध्ये पुढे असे म्हटले आहे की, अनेक प्री मॅच्युअर बाळांना आयुष्यभर विकारांना सामोरे जावे लागते. तर काही जण मात्र पूर्णपणे चांगले आयुष्य जगतात. काहीजण विस्टन चर्चिल अल्बर्ट आईन्स्टाईन आणि हा आमचा मुलगा आर्थर जेटली हेगसारख्या मोठ्या आणि लोकप्रिय व्यक्तीही होतात. आर्थरसाठी तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वाद कायम असू द्या. तसेच प्रीमॅच्युअर मुलांची काळजी कशी घ्यावी याबाबतही वाचत रहा असा सल्ला ही सेलिनाने शेवटी दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER