आरोग्याची आणि संरक्षणाची गुढी उभारून हा सण घरीच साजरा करू या! – शरद पवार

Sharad Pawar

मुंबई : आज हिंदू नवं वर्षाचा दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस. आजचा दिवस म्हणजे सर्वानी मिळून साजरा करणारा सण. मात्र देशासह महाराष्ट्रात कोरोनासारख्या जीवघेण्या आजारामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत, कोरोनाशी लढण्यासाठी काही सूचनादेखील केल्या आहेत.

गुढीपाडवा हा नव्या आशा-आकांक्षांचा, नवसंकल्पांचा सण आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त या नववर्षाला ‘कोरोनामुक्त भारताचा’ संकल्प करू या! आरोग्याची आणि संरक्षणाची गुढी उभारून हा सण घरीच साजरा करू या!

सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! असे पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले आहे.

तर, सोशल डिस्टन्सिंग ही कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात वैश्विक समूहाची सामरिक नीती बनली पाहिजे. असे म्हणत ग्राफिकच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगमुळे कोरोनावर कश्याप्रकारे मात करता येऊ शकते याच उदाहरण प्रस्तुत केलं आहे.