नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी साधेपणाने साजरे करा,मुख्यमंत्र्यांचं आवाहन

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महत्त्वाचं आवाहन केलं आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) हे सण साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला केले आहे. गणपती उत्सवादरम्यान जनतेने ज्याप्रमाणे प्रशासनास सहकार्य केले त्याच प्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे. नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही (Navratri) साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होऊ, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक शासनाने काढले होते. त्याचप्रमाणे या नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी या सणांबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER