औरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा

Shiv Sena - Aurangzeb - BJP - Sanjay Pandey

मुंबई :- शिवसेना (Shiv Sena) टिपू सुलतानची (Tipu Sultan) जयंती साजरी करणार आहे. भाजपा (BJP) प्रदेशचे उत्तर भारतीय मोर्च्याचे अध्यक्ष संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी यावर टोमणा मारला. शिवसेना टिपू सुलतानची जयंती साजरी करणार असल्याचे वृत्त ऐकून मोठा धक्का बसला, आता शिवसेनेने औरंगजेबाची (Aurangzeb) जयंतीही साजरी करावी.

पांडे यांनी ट्विट केले – ज्या टिपू सुलतानाने असंख्य हिंदू बांधवांचे सक्तीने धर्मांतर केले, अशा क्रूरकर्म्याची जयंती शिवसेना साजरी करणार आहे. सत्ता टिकविण्यासाठी शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायलाही मागेपुढे पाहणार नाही.

ही बातमी पण वाचा : नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही ; शिवसेनेचा  इशारा

पांडे यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे – टिपू सुलतानाचा इतिहास शिवसेनेला माहीत नसेल असे म्हणता येणार नाही. तरीही शिवसेना टिपूची जयंती साजरी करायला निघाली आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना हिंदुत्वासाठी लढणे शिकवले, त्याच शिवसेनेने टिपू सुलतानची जयंती साजरी करावी यासारखी दुःखदायक गोष्ट नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी हिंदुत्वासाठी प्रसंगी सत्ताही लाथाडली त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला सत्तेसाठी कोणत्या स्तराला जावे लागते आहे हेच यातून दिसते.

शिवसेनेने एवढ्यावरच थांबू नये, आता शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी, असा टोमणा पत्रकात शेवटी मारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER