कोल्हापुरात मास्क न वापरणाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच

CCTV -Mask

कोल्हापूर :  कोल्हापुरातील कोरोनाचा (Corona)वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहरातील सीसीटीव्हीच्या (CCTV) माध्यमातून कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचा (Social Distancing) भंग आणि मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची पोलिस बंदोबस्तात मोहीम राबविण्यात येत आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.

corona virus: Safe CCTV now looks at those who do not use masks | corona virus: मास्क न वापरणाऱ्यांवर आता सेफ सीसीटीव्हीची नजर

याची दखल घेत प्रशासनाने शहरात सेफ सिटी अंतर्गत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

मास्क न वापरणाऱ्यांची छायाचित्रे काढून संबंधित व्यक्तीवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची मदत घेतली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER