CBSE दहावीच्या परीक्षा रद्द, पण महाराष्ट्र बोर्डाचे काय?; वर्षा गायकवाड म्हणाल्या…

Varsha Gaikwad

मुंबई : CBSE बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाचा अभ्यास करू, असे म्हणाल्या.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील बोर्डाच्या परीक्षांबाबत आम्ही तज्ञांचे मत घेऊ. सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा अभ्यास करू, दोन दिवसांपूर्वी सरकाने महाराष्ट्रातील दहावी-बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

CBSE बोर्डाची दहावी-बारावीची परीक्षा ४ मे पासून सुरू होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. तर, बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button