सीबीएसई : १२ वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSE 12

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या १२ वी २०२१ च्या प्रॅक्टिकल परीक्षा १ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान होतील. या तारखा संभाव्य आहेत. निश्चित तारखांसंदर्भातील सूचना लवकरच अधिकृत वेबसाईटवर जारी केल्या जातील. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने  (CBSE)  १२ वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या.

या तारखा संभाव्य असल्याचे सांगण्यात आले आहे.  तारखांसंदर्भातील सूचना अधिकृत वेबसाईटवर जारी केल्या जातील. तारखांसोबतच परीक्षांची नियमावलीही जारी केली आहे. प्रॅक्टिकल परीक्षांसाठी एक ऑब्जर्वर नेमण्यात येणार आहे. ऑब्जर्वर प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट्सच्या मूल्यांकनावर लक्ष  ठेवेल. इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्हीही परीक्षक असतील. सर्व शाळांना एक लिंक देण्यात येणार आहे. त्या लिंकवर शाळांना विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करायचे आहेत.

१० वी-१२ वी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर होणार

सीबीएसई १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी दिली. कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. याचा परीक्षांवरही परिणाम झाला. सीबीएसई १० वी आणि १२ बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. मात्र यावर बोर्ड सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER