CBSE Exam 2021: दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय; परीक्षा केंद्र बदलाबाबतची घोषणा!

CBSE Exam 2021 - Maharashtra Today

नवी दिल्ली : सीबीएसईने (CBSE) बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास सीबीएसईने परवानगी दिली आहे. यासंदर्भात सीबीएसईने ऑफिशियल वेबसाईट cbse.gov.in वर नोटीस जारी केले आहे. या निर्णयानुसार विद्यार्थी एका केंद्रावरून प्रात्याक्षिक परीक्षा आणि एका केंद्रावरून लेखी परीक्षा देऊ शकतात.

विद्यार्थ्यांना काय करावे लागेल?

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याचा अर्ज शाळेमार्फत करावा लागेल. अर्जामध्ये ज्या परीक्षा केंद्रावरून परीक्षा देऊ इच्छितात, त्या केंद्राबद्दल माहीती द्यावी लागेल. परीक्षा केंद्र बदलण्याचा अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ मार्च पर्यंत आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाईटवरून अर्ज करू शकतात.

सीबीएसई परीक्षेसंदर्भात नियम

  • दहावी-बारावीच्या मुख्य परीक्षांमध्ये निश्चित वेळेचे अंतर असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव दूर होईल आणि त्यांना तयारीसाठी वेळ मिळेल.
  • बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल.
  • दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षा ही परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल. चार दिवस परीक्षा होईल.
  • मॉर्निंग शिफ्टमध्ये मुख्य विषयांची परीक्षा होईल. जे शिक्षक सकाळच्या शिफ्टला काम करेल त्यांना दुपारच्या शिफ्टला काम करावे लागणार नाही.
  • सीबीएससी बोर्ड परीक्षेचे कंट्रोलर डॉ. संयम भारद्वाजकडून जारी केलेल्या नियमांनुसार, यावर्षी कमीत कमी दिवसांमध्ये या परीक्षा आयोजित केल्या जातील. गेल्या वर्षी २०२०मध्ये परीक्षा शेड्युल ४५ दिवसांचा होता. यंदा हा ३९ दिवसांचा असेल.
  • दहावीच्या वर्गाची ७५ विषयांची परीक्षा आणि बारावीच्या १११ विषयांची परीक्षा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER