10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठी घोषणा ; सीबीएसईकडून वेळापत्रकात बदल

CBSE

मुंबई :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर CBSE बोर्डाने आपल्या वेळापत्रकात (CBSE revised date sheet) बदल केले आहेत. 10 वी आणि 12 वीच्या काही विषयांच्या परीक्षा तारखांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. cbse.gov.in CBSE बोर्डाअंतर्गत घेण्यात येणारी 12 वीच्या विद्यार्थ्यांची फिजिक्स विषयाची परीक्षा 13 मे रोजी होणारी होती. मात्र नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा 8 जून रोजी होईल. तसंच 12 वीच्या गणित विषयाची 1 जूनला होणारी परीक्षा 31 मे रोजी घेण्यात येईल.

12 वीच्या विद्यार्थ्यांची Web application ची परीक्षा 3 जून ऐवजी 2 जूनला होणार, तर भूगोल विषयाची परीक्षा 2 जून ऐवजी 3 जून रोजी होणार आहे. दरम्यान राज्यात यावर्षी परीक्षा होणारच आहे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत ठणकावून सांगितले. आमची प्राथमिकता मुलांच्या आरोग्याला आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊनच आम्ही परीक्षा घेणार आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दहावीच्या, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन घेतली होती. दोन महिने दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका वितरणासाठी लागतात, त्यामुळे ती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. त्यामुळे काठिण्य पातळीबाबत उपस्थित केलेला मुद्दा आता गौण आहे. भौगोलिक स्थिती बघून आपण टाईमटेबल ठरवले आहे, असे वर्षा गायकवाड विधानसभेत म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER