सीबीएसई बोर्ड : दहावी-बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही

exam-student

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या काही वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचं स्पष्टीकरण बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. त्याचबरोबर अनेक माध्यमांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने निकालाची बातमी दिली होती. मात्र ‘एएनआय’नेही हे वृत्त मागे घेत असल्याचं नमूद केलं.

आज दुपारपासून सोशल मीडियावर सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत चुकीची माहिती फिरत आहे. दहावी आणि बारावी परीक्षेचा निकालाबाबत एक नोटीस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, ही नोटीस खोटी असल्याचं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा फेक नोटीसवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. तसेच सीबीएसईद्वारा निकालाची माहिती अधिकृत संकेतस्थळ cbseresults.nic.in यावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या वेबसाईटवर चेक करण्यास सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER