सीबीएसई (CBSE) बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

CBSE Result

मुंबई :- देशात कोरोनाचे (Corona) थैमान असताना दुसरीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसई दहावीत देशभरात ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील सीबीएसई संलग्न शाळांच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.०५ आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचा समावेश असलेल्या पुणे (Pune) केंद्राचा क्रमांक देशात चौथा आहे.

यंदा १८ लाख ८५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ७३ हजार १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थी पास झाले आहेत. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) निशंक यांनी बुधवारी निकाल जाहीर होईल अशी घोषणा केली होती. विद्यार्थी www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. विद्यार्थी संकेतस्थळाशिवाय एसएमएस, डिजीलॉकर आणि उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER