सीबीआय, ईडीकडून कोळसा तस्करीप्रकरणात धाडी

मुंबई :- पश्चिम बंगालमधील (West Bengal) कोळसा तस्करीप्रकरणात (Coal smuggling case) सीबीआयने (cbi) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कारवाई केली आहे. अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना समन्स देण्यासाठी सीबीआय त्यांच्या घरी पोहचली. कोळसा तस्करी प्रकरणातील चौकशीसाठी त्यांना नोटीस बजावण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी यांच्यावर कोळसा तस्करीप्रकरणी चौकशी केली.

कोट्यवधी कोळशाच्या तस्करीप्रकरणी कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागात शुक्रवारी सकाळी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकाऱ्यांनी छापा टाकले. या अधिकाऱ्यांनी दक्षिण कोलकाता येथील बन्सड्रोनी याला पकडले. त्यांनतर एका व्यावसायिकाच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकले. सीबीआयने मध्य कोलकाता येथील चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयात तसेच कोळशाच्या पट्ट्यातील आसनसोल-दुर्गापूर येथेही छापा टाकला.

पश्चिम भागातील ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या कंपनीवर अनेक वर्ष अवैध काम केल्याचे आरोप आहे. त्यांनी अवैधपणे कोळसा काळ्या बाजारात विकला. या विक्रीतून मिळालेले पैसे शेल कंपन्यांच्या माध्यमातूनव्यवहारात आणले आणि सत्ताधारी पक्षात गेले. या घोटाळ्यात अभिषेक बॅनर्जी यांचाही सहभाग असल्याचा आरोपही भाजपाने केला आहे.

कोळसा तस्करी घोटाळ्यात केंद्रीय ब्युरो इन्व्हेस्टिगेशनने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांनी पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी केली. अभिषेक बॅनर्जी यांच्या मेहुणी मेनका गंभीरचीही चौकशी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER