सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी; मैत्रीण रिया चक्रवर्तीने मागितली अमित शाह यांना मदत

Shushant Singh Rajput

मुंबई : अभिनेता सुशांत सिंहने (Shushant Singh Rajput) १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.त्याने आत्महत्या का केली याचा पोलिसांना अजून काहीही सुगावा लागला नाही. अनेकांनी याबाबत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. सुशांत याची मैत्रीण रिया चक्रवर्तीनेही (Rhea Chakraborty) आता ही मागणी केली आहे.

रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याबाबत विनंती केली आहे. इतकं मोठं पाऊल उचलण्यासाठी सुशांतवर कोणता दबाव होता हे मला जाणून घ्यायचे आहे, असे रियाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

रिया चक्रवर्तीचे ट्विट – “आदरणीय अमित शाह सर…मी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती…सुशांत सिंगच्या निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. पण न्याय मिळावा यासाठी आपण सीबीआय चौकशीचा आदेश द्यावा अशी हात जोडून विनंती आहे. हे पाऊल उचलण्यासाठी सुशांतवर कोणता दबाव होता हे मला जाणून घ्यायचं आहे”. रियाने ट्विटमध्ये सत्यमेव जयते हॅशटॅगही वापरला आहे. तिने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही केली आहे.

याआधीच्या एका पोस्टमध्ये रियाने म्हटले आहे की मला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ‘मला मारेकरी म्हटले .. मी गप्प बसले, अर्वाच्च शिवीगाळ केली.. मी गप्प बसले, मला फायदा उचलणारी म्हटले .. मी गप्प बसले. पण म्हणून मी आत्महत्या केली नाही. माझ्यावर बलात्कार किंवा हत्या करण्याचा कोणता अधिकार तुम्हाला मिळतो? तू जे म्हणालीस त्या गोष्टीची गंभीरता तरी तुला ठाऊक आहे का? हा गुन्हा आहे आणि कायद्यानुसार कोणाचाही, मी पुनरुच्चार करते की कोणाचाही अशाप्रकारे छळ होऊ नये. आता पुरे झालं’, असं लिहित रियाने सायबर क्राइम सेलला कारवाईची विनंती केली आहे.

सुशांत आणि रिया एकमेकांना डेट करत होते. वांद्रे येथील घरात ते एकत्र राहत होते अशीही चर्चा आहे. सुशांत सिंहचे शव कूपर रुग्णालयात नेले होते तेव्हा रिया रुग्णालयात गेली होती. पण त्याच्या अंत्यसंस्काराला ती हजर नव्हती. पोलिसांनी रियाचाही जबाब नोंदवला आहे. रियाने पोलिसांना सांगितले की, सुशांतने यशराज फिल्मसोबतचे करार रद्द केले होते आणि मलाही तसे करण्यास सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER