पूजा चव्हाणच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा; तृप्ती देसाईंची मागणी

Trupti Desai

परळी : पूजा चव्हाण (Pooja Chavan) या युवतीच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करा, अशी मागणी ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृत्पी देसाई (Trupti Desai) यांनी केली. परळी येथील वसंत नगर तांडा येथे शनिवारी दुपारी पूजा चव्हाण यांच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

देसाई म्हणालात, पूजाच्या मृत्यूचे सत्य बाहेर आले पाहिजे, तिला न्याय मिळायला हवा. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या प्रकरणाची सीबीआय चोकशी करा अशी मागणी त्यांनी केली. त्या म्हणाल्यात, राज्यातील एखादा मंत्री गायब कसा व्होऊ शकतो? या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करा.

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाच्या ५ बहिणींपैकी चौघींचे लग्न झाले आहे. पूजा १ महिन्यापूर्वी पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली, असे सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER